
सुप्रिया लाईफसायन्स कंपनीकडून जिल्हा पोलीस प्रशासनाला औषधी गोळ्यांचे वाटप
रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनातील कोरोना योध्ये, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी उपाययोजना करत आहेत. ही भावना लक्षात घेवून लोटे येथील सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडचे मालक सतिश वाघ यांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील सुमारे १८०० पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी मल्टिव्हीटॅमीन कॅप्सुल ५०० बॉक्स, २० ट्रिप्स १० कॅप्सुल्स आणि व्हिटॅमिन सी टॅब्लेट ३६० बॉक्सेस, १५ ट्रिप्स २० टॅब्लेट ही औषधे रत्नागिरी पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्याकडे कंपनीच्यावतीने प्रशांत साकुंडे (एचआर) व संजय सावंत (एक्साईज) यांनी सुपूर्द केली.
www.konkantoday.com