
जगबुड़ी नदीने धोक्याची पातळी ओलांडली; शहराला पुराचा वेढा पडण्याची शक्यता
खेड : खेड शहरालगत वाहणाच्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहू लागल्या असल्याने शहरातील व्यापारी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. नगरपालिका प्रशासनाने व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गेले चार दिवस तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
सह्याद्रीच्या खोन्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुड़ी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी कमालीची वाढली आहे. जगबुडी नदीची इशारा पातळी ६.५० तर धोक्याची पातळी ७ मीटर इतकी आहे. काल रात्री जगबुडी इशारा पातळीवर वहात होती. मात्र आज दुपारी जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडल्याने खेड बाजारपेठेतील व्यापान्यांची चिंता वाढू लागली.
जगबुड़ी प्रमाणे नारिंगी नदीचे पाणीही क्षणाक्षणाला वाढत आहे. त्यामुळे खेडची बाजारपेठ कधीही पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नारिंगी नदीकाठी असलेली भातशेती पाण्याखाली गेली की या नदीचे पाणी दापोली नाका येथून बाजारात भरायला सुरवात होते. तर जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केट येथून बाजारपेठेकडे उसळी मारू लागते. एकाच वेळी दोन्ही बाजूने पाणी शहरात शिरायला सुरवात होत असल्याने पावसाचा जोर वाढला की व्यापाऱ्यांची चिंता वाढू लागते.
गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नातुवाडी, शिरवली, पिंपळवाडी, शेलारवाड़ी आणि तळवट या पाचही धरणामध्ये पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे या घरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी जगबुडी नदीला मिळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी क्षणाक्षणाला वाढू लागली आहे. हे पाणी कधीही बाजारपेठेत घुसण्याची शक्यता असल्याने व्यापारी आणि शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.
www.konkantoday.com