
कलकाम कंपनी बाबत पोलिसांच्या आश्वासनानंतर उपोषण सध्या स्थगित
कलकाम कंपनीने रत्नागिरी जिल्ह्यातील ग्राहकांची गुंतवलेली रक्कम अद्याप परत दिली नाही, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्राहक आणि प्रतिनिधी येत्या १५ ऑगस्ट रोजी उपोषणाला बसणार होते. मात्र पोलीस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे व उपनिरीक्षक अमरसिंह पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर उपोषणाचा मार्ग तूर्त स्थगित ठेवण्यात आला आहे.
येत्या दहा दिवसांत कलकाम कंपनीचे संस्थापक विष्णू दळवी, विजय सुपेकर आणि सुनील वांद्रे यांना बोलावून ग्राहक आणि संचालकांची एकत्रित बैठक घडवण्याचे आश्वासन पोलिसांनी गुंतवणूकदारांना दिले. या पार्श्वभूमीवर उपोषण मागे घेण्यात आले असल्याची माहिती नवनीत जाधव, मानाजी आयरे, संतोष भाटकर, इरफान जबले, तुषार बेर्डे, माधवी भोसले, स्नेहा कदम, चित्रा राणे, इक्रा काझी, पूजा सावंत यांनी दिली.
www.konkantoday.com