रक्ताचे नाते नसले तरी चिपळूण नगर परिषदेचे कर्मचारी बजावताहेत कोरोना योध्द्याची भूमिका

जीवघेण्या विषाणुमुळे रक्ताची नाती दुरावत असली तरी माणुसकीचा जिव्हाळा आजही जीवंत असल्याचा दाखला येथील नगर परिषद प्रशासनाने दिला आहे. कोरोनाबाधित व संशयित रूग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा प्रश्‍न निर्माण होत असतानाच अधिकारी, कर्मचारी स्वतःहून पुढे येवून त्या मृत व्यक्तींवर कुटुंबाप्रमाणेच अंत्यसंस्कार करत आहेत. आतापर्यंत तब्बल १४ मृत व्यक्तींवर शहरातील चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत या कोविड योद्ध्यानी अग्नी देत माणुसकीचे खरेखुरे दर्शन घडवले. पीपीई कीट घालून स्मशानभूमीत लाकडे रचण्यापासून ते अग्नी देण्यापर्यंतचे काम हे पथक करीत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button