
सुरज मधाळेच्या वावटळ फिल्मची अमेरिकेतील फेस्टीव्हलसाठी निवड
साखरपा- कोंडगांव येथील नवोदित दिग्दर्शक सुरज उद्धव मधाळे यांच्या वावटळ फिल्मची न्यू जर्सी अमेरिका येथे होणार्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड करण्यात आली आहे.
फिल्म फेस्टीव्हलचा कार्यक्रम दि. १८ ते २० सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. हा फेस्टीव्हल ऑनलाईन दाखवण्यात येणार आहे. फेस्टीव्हलसाठी जगातील १२ फिल्मची निवड करण्यात आली असून त्यात सुरज मधाळे याच्या वावटळ फिल्मचा समावेश करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंडगाव भागातील फिल्म फेस्टीव्हलमध्ये यश मिळविण्याची बहुधा ही पहिलीच वेळ आहे.
कॉम्प्युटर इंजिनियर असलेल्या सुरज मधाळे याने भारतीय चित्रपट, दूरचित्रवाणी संस्था पुणे येथे दिग्दर्शनाचे शिक्षण घेतले आहे. साखरपा येथे त्याचे प्राथमिक शिक्षण झाले.
www.konkantoday.com