
कोकणवासियांचा एवढा राग का? असा शब्दात भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका
कोकणात निघालेल्या चाकरमान्यांची सरकारनं सोय न केल्यानं चाकरमानी गणेशोत्सवासाठी ई-पास काढून जात आहेत. मात्र त्या ई-पासमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतो आहे. तर उत्तर भारतीयांना बस आणि ट्रेन, मग कोकणावासियांना का नाही?, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
अनेक चाकरमानी हे गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणाकडे निघाले आहे. मात्र शिवसेनेचे खासदार विनायक राऊतांच्या आवाहनावर भाजप आणि मनसेनं आक्षेप घेतला आहे. गणेशोत्सवासाठी आवश्यकता आहे त्यांनीच यावं, बाकीच्यांनी येऊ नये असं विनायक राऊत म्हणाले आहेत.कोकणवासियांचा एवढा राग का? असा शब्दात भाजप नेते आशिष शेलारांनी शिवसेनेवर टीका केले आहेत.
एसटी बसद्वारे चाकरमान्यांना कोकणात आणू, असं परिवहन मंत्री अनिल परब वारंवार म्हणाले आहेत. मात्र चाकरमान्यांसाठी तशी सोय काही झाली नाही. त्यामुळे ई-पास काढून चाकरमानी कोकणात येत आहेत. मात्र ई-पासमध्येही भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
www.konkantoday.com