
विनायक राऊतांचे वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचे -भाजपचे नेते प्रवीण दरेकर
मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी अत्यावश्यक असेल तरच गणेशोत्सवासाठी कोकणात यावं, असे वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केले होते. या वक्तव्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली. ‘ विनायक राऊतांचे वक्तव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. त्यामुळे कोकणच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. त्याची किंमत आता शिवसेनेला मोजावी लागेल,’ असे प्रवीण दरेकर म्हणाले.विनायक राऊत यांनी केलेले वक्त्यव्य अत्यंत दुटप्पीपणाचे आहे. एका बाजूला भावना आणि दुसऱ्या बाजूला वस्तुस्थिती आहे. या कोकणच्या जनतेच्या भावनेवर शिवसेना स्वार झाली. ज्या चाकरमान्यांनी शिवसेना वाढविली, त्याच चाकरमान्यांच्या भावनेला ते आता पायदळी तुडवत आहेत,’ असेही प्रवीण दरेकर म्हणाले.
www.konkantoday.com