
ग्रामपंचायतीचा गणपतीपुळे एमटीडीसीच्या खाजगीकरणाला विरोध
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) खाजगीकरणाचा धोरणात्मक निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सदर निर्णयाला गणपतीपुळे ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील एमटीडीसीच्या पर्यटन निवास रिसॉर्टचे कोणत्याही क्षणी खाजगीकरण होणार आहे. ९० वषर्घंच्या कराराने रिसॉर्टची जागा खाजगी व्यक्ती, संस्थांना भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने जाहीर केलेल्या निर्णयात श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील रिसॉर्टचा देखील समावेश आहे. गणपतीपुळे रिसॉर्टसाठी बक्षीसपत्राने एमटीडीसीने घेतलेल्या जागेच सात बाराधारक यांनी या संदर्भात आपली भूमिका जाहीर केली. शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास अनेक जमिन मालकांना त्याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एमटीडीसीचे हळुहळू खाजगीकरण केले जाणार आहे
www.konkantoday.com