
लॉकडाऊनमध्ये घरी आलेल्या तरूणांनेकेली ड्रोनची निर्मिती
मुंबई -पुण्यासारख्या शहरात लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाल्यामुळे कोकणातील अनेक तरूण आपल्या गावी परतले आहेत. गेले काही महिने त्यांचा मुक्काम कोकणात आहे. साखरप्यामधील पुरूषोत्तम जाधव हा तरूण बारावी झाल्यानंतर आयटीआय करून वसई येथे एका खाजगी कंपनीत नोकरीला होता. लॉकडाऊनमुळे हा तरूण घरी साखरपा येथे आला होता. लहानपणापासून इलेक्ट्रॉनिक्सची आवड असलेल्या पुरूषोत्तमने बसल्या बसल्या ड्रोनची निर्मिती करण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने युट्युबवरून माहिती घेतली. त्यासाठी आवश्यक असणारे भारतीय पार्ट त्याने अहमदाबाद येथून मागविले व केवळ पंधरा दिवसात त्याने हा ड्रोन तयार केला असून आता त्याच्यावर कॅमेरा बसविण्यात येणार आहे. सध्या या ड्रोनची उडण्याची चाचणी घेण्यात आली असून हा ड्रोन २०० मीटर उंचीपर्यंत जावू शकतो. त्यासाठी आतापर्यंत अंदाजे २२ हजार रुपये खर्च आला आहे. इच्छा आणि चिकाटी असेल तर कुठेही असलो तरी आपण चांगले काम करू शकतो असेही पुरूषोत्तमने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
www.konkantoday.com




