
मुंबईतील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गकडे धाव
काेकणातील गणेशोत्सवाला महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. तरीही मुंबईतील चाकरमान्यांनी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गकडे धाव घेतल्याचे चित्र गेल्या दोन दिवसापासून आहे काल दिवसभरात सुमारे दोन हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाल्याने खारेपाटण चेकपोस्टवर वाहनांचा पुन्हा एकदा रांगा लागल्या होत्या.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबईतील हजारो चाकरमान्यांनी सिंधुदुर्गकडे धाव घेतली. हा चाकरमान्यांचा ओघ आता पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे. मुंबई व राज्याच्या इतर भागातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची खारेपाटण चेकपोस्टवर नोंद घेतली जात आहे. त्यामुळे चेकपोस्टवर दीड ते दोन किलोमिटरपर्यंत वाहनांचा रांगा लागल्या हाेत्या
www.konkantoday.com