रत्नागिरीतील नवनिर्माण हायचा सलग पाचव्या वर्षी १०० टक्के निकाल- जोएब, पल्लवी, तेजस, श्रध्दा मेरीट मध्ये


नवनिर्माण हाय या रत्नागिरी जिल्ह्यातील पहिल्या सीबीएस्सी शाळेचा ह्यावर्षी दहावी परिक्षेत १०० टक्के उत्तीर्ण निकाल जाहीर झाला असून सलग पाच वर्ष १०० टक्के निकालाची परंपरा शाळेने सुरु ठेवल्याने पालकवर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. नुकताच जाहिर झालेल्या सीबीएस्सी बोर्डाच्या २०२० च्या बॅचला नवनिर्माण हाय चे ५७ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. हे सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळेतील चार विद्यार्थी मेरीटमध्ये आले असून जोएब बांगी ९५ टक्के मार्क मिळवत शाळेत प्रथम आला. तर पल्लवी हडडीमनी ९४.४ टक्के, तेजस माकुडे ९२.२ टक्के श्रध्दा गवळी ९० टक्के, अशी चार मुले बोर्डाच्या गुणवत्ता यादीत चमकली आहेत.
कोवीड लॉकडाऊन काळात दहावीचा निकाल कधी जाहिर होतो कसा जाहिर होतो याची उत्सूकता विद्यार्थी आणि पालकांना लागून राहीली होती. आज निकाल जाहिर होताच विद्यार्थी आणि पालकंाच्यात आनंदाचे वातावरण होते. यावेळी मेरीटमधील विद्यार्थी मात्र काही प्रमाणात नाराजी व्यक्त करतांना आढळले. काही विद्यार्थांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाल्याने ते नाराज होते.
नवनिर्माण हाय शाळेने सतत पाच वर्ष १०० टक्के निकालाची आणि मेरीट लिस्ट मधील गुणवान विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेची परंपरा कायम ठेवल्याबद्दल प्राचार्या नजमा मुजावर आणि सर्व नवनिर्माण टीम आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष माजी न्यायमुर्ती भास्कर शेट्ये, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी विशेष अभिनंदन केले आहे. कोवीड १९ या महाभयंकर साथीत ऑनलाइन माध्यमाद्वारे शाळेने संपुर्ण विद्यार्थ्यांचा रोज शालेय वेळापत्रकाप्रमाणे नियमित अभ्यास सुरु ठेवल्याबद्दलही त्यांनी शाळेच्या सर्व स्टाफला आणि सहकार्य करणार्‍या पालकवर्गाला विशेष धन्यवाद दिले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button