
अशा कठीण परिस्थितीत परीक्षा घेणं योग्य आहे का?आता तरी UGC ला पटेल का? -उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. राजभवनापासून ते बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यापर्यंत कोरोना पोहोचला आहे. अशा सुरक्षित ठिकाणी देखील कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे आता तरी UGCला पटेल का? असा प्रश्न उपस्थित करत उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी चिंता व्यक्त करत भाजपला टोला लगावला आहे. कोरोना काळात देखील अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यावरून वाद निर्माण झाला होता.
वाद निर्माण झाला असला तरी राज्य सरकार मात्र परीक्षा न घेण्याच्या त्यांच्या निर्णयावर ठाम आहे. ‘राजभवनात कोरोना पोहोचला आहे. अमिताभ बच्चन देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.’ अशा सर्व कठीण परिस्थितीत परीक्षा घेणं योग्य आहे का?असा प्रश्न उदय सामंत यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
www.konkantoday.com




