
आता हॉटेल व्यावसायिकांचे ना.उदय सामंत यांना साकडे
रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याबाबत व्यापारी संघटनेच्या मागणीप्रमाणे ना. उदय सामंत यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यापार्यांशी चर्चा केली होती त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापार्यांना एक दिवस आड दुकाने उघडण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली होती. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे यांनी राज्यात क्षमतेच्या ३३ टक्के हॉटेल व्यवसाय उघडण्याची घोषणा केली होती. मात्र त्याची अंमलबजावणी अद्याप रत्नागिरी जिल्ह्यात झाली नव्हती. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी परत एकदा ना. उदय सामंत यांना साकडे घातले आहे. आज हॉटेल संघटनेचे अध्यक्ष रमेश कीर व अन्य हॉटेल व्यावसायिकांनी ना. उदय सामंत यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी हॉटेल व्यावसायिकांची बाजू रमेश कीर यांनी मांडली. किमान रेस्टॉरंट उघण्यास परवानगी मिळावी तसेच लॉकडाऊन काळातील कराची आकारणी वाणिज्य पद्धतीने करू नये आदी मागण्या सामंत यांच्यासमोर मांडल्या. त्यावेळी सामंत यांनी हॉटेल व्यावसायिकांना प्रस्ताव पाठवण्याची सूचना केली. याबाबत आपण राज्याचे उच्च सचिवांशी याबाबत आजच चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
www.konkantoday.com