
रत्नागिरी जिल्ह्यातील लॉकडॉऊन बाबत आज निर्णय जाहीर होणार
रत्नागिरी जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढत असल्याने १जुलै ते ८ जुलै रत्नागिरीत लाॅकडाऊन केल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली होती त्याची मुदत आज रात्राै संपत आहे लॉकडॉऊन करूनही जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांत रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून जिल्ह्यासह शहराच्या विविध भागात काही रुग्ण सापडले आहेत आज गृह राज्यमंत्री नामदार शंभुराजे देसाई रत्नागिरी दौऱयावर येत आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयात लॉकडॉऊन बाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेणार आहेत त्यानंतर जिल्हा प्रशासन लॉकडॉऊन बाबत निर्णय जाहीर करेल असा अंदाज आहे राज्य शासन एकीकडे मिशन बॅक अगेन खाली अनेक निर्णय घेत आहे त्यामुळे शासनाने राज्यात दुकानांची वेळ वाढवून देण्यास मंजुरी दिली असून याशिवाय हॉटेलनाही क्षमतेच्या तेहतीस टक्के उघडण्यास परवानगी दिली आहे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने आपल्या आदेशात सुधारणा करून तीन दिवसांनी हॉटेलमधील होम डिलिव्हरीला परवानगी दिली होती राज्य शासनाने स्थानिक पातळीवर काही निर्णय घेण्यास जिल्हा प्रशासनाला अधिकार दिलेले आहेत त्यामुळे लॉकडॉऊन बाबत प्रशासन काय भूमिका घेणार हे आज स्पष्ट होईल
www.konkantoday.com