
कोरोनावर मात केलेल्या २ नवजात बालकांसह २ मातांवर पुष्पवृष्टीकरून रुग्णालयातून निरोप
रत्नागिरी येथील कोरोना रुग्णालयात आज कोरोनावर मात केलेल्या २ नवजात बालकांनसह २ मातांना पुष्पवृष्टी करून रुग्णालयातून निरोप देण्यात आला.यावेळी रुग्णालयाचे ज्येष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर दिलीप मोरे आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.या रुग्णालयातून गेल्या तीन महिन्यात ३२ बालकांनी कोरोनावर मात केली आहे.त्यामुळे रत्नागिरीत कोरोनामुळे बालमृत्यूचा दर शून्य टक्के आहे.
www.konkantoday.com