
भाट्ये गावात भा.ज.पा. ची जोरदार मुसंडी भाट्ये ग्रामपंचायत उपसरपंच सौ. किरण नाईक, सदस्य विजय भाटकर यांचे सह अनेकांचा भा.ज.पा.मध्ये प्रवेश.
भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनात्मक बदल झाल्यानंतर शहराप्रमाणे ग्रामीण भागातही भा.ज.पा.ने संघटनात्मक मुसंडी मारायला सुरुवात केल्याचे दिसत आहे. आज भाट्ये ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच सौ. किरण नाईक, ग्रा. प. सदस्य विजय भाटकर तसेच धडाडीचे सुशील मधुकर भाटकर, दशरथ मुरकर, राजेश भास्कर भाटकर, जगदीश शांताराम भाटकर, प्रियांका प्र. नार्वेकर यांना भा.ज.पा. जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांचे भा.ज.पा. प्रवेश दिला. तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांच्या नेतृत्वाखाली भा.ज.पा. ध्येयधोरण सर्वदूर पोहोचवण्यासाठी भा.ज.पा. मध्ये सर्वांचे स्वागत असल्याचे अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे यांनी तालुक्यामध्ये भा.ज.पा. मजबुतीने उभा राहील. भा.ज.पा.ची संघटनात्मक ताकद लक्षणीय आहे. आज भाट्ये गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे भाट्ये ग्रामपंचायतीतील भा.ज.पा.ची ताकद वाढली आहे, असे सांगत उभयतांचे स्वागत मुन्ना चवंडे यांनी केले. या प्रसंगी अमित देसाई, योगेश सावंत, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर आदी उपस्थित होते. सौ. किरण नाईक यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची कार्यशैली, राज्यस्तरावर देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्व गुरु विकासाची परिभाषा बदलून वेगवान विकास करू शकतात. हा विश्वास vवाढत असल्याने आज भा.ज.पा. प्रवेश केला आहे, असे सौ. किरण नाईक म्हणाल्या
www.konkantoday.com