
पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या वतीने रत्नागिरी साठी चार ऑक्सीजन उपकरणे मिळाली,पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी मानले आभार
कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करता येईल यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन उपकरणे वापरली जातात. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावतीने रत्नागिरी जिल्ह्यासाठी अशी चार उपकरणे पाठविण्यात आली आहेत.
कोरोना बाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी या यंत्रांची खूप मोठी मदत होत असते सदर उपकरणे येथील जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आली आहेत.
रत्नागिरी साठी अशी उपकरणे उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी पर्यावरण मंत्री श्री आदित्य ठाकरे यांचे जिल्हा वासीयांच्या वतीने आभार मानले आहेत.
www.konkantoday.com