
सरकारने टिकटॉक बंद केल्यानंतर भारतातील त्याचे प्रतिस्पर्धी ‘चिंगारी’ व ‘मित्रों’ अॅपची सरशी
भारतात सरकारच्या आदेशानंतर टिकटॉक हे चिनी अॅप बंद होताच त्याची जागा ‘चिंगारी’ या अॅप घेतली आहे. त्याचे प्लेस्टोअरवरून १ कोटीहून अधिक डाऊनलोड झाले आहेत.
भारत सरकारने अलीकडेच टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घातली होती. टिकटॉक हे लघुचित्रफीत उपयोजन चीनच्या बाइटडान्सच्या मालकीचे आहे. सरकारने टिकटॉक बंद केल्यानंतर भारतातील त्याचे प्रतिस्पर्धी उपयोजन असलेल्या ‘चिंगारी’ व ‘मित्रों’ अॅपची सरशी झाली आहे. चिंगारी अॅपचे तासाला १ लाख डाउनलोड झाले आहेत
www.konkantoday.com