
साजरा करणारलालबागच्या गणेशोत्सव मंडळ
यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील प्रसिध्द असलेल्या लालबागच्या गणेशोत्सव मंडळाने धाडसी निर्णय घेतला आहे. यंदा लालबागच्या राजाच्या मूर्तीची स्थापना करणार नसल्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यत्सव आयोजित केला जाणार आहे. ११ दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या ११ दिवसांमध्ये रक्तदान शिबिरे तसेच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोक येत असतात. यंदा या आजूबाजूकडीलच नव्हे तर संपू्ण राज्यावर कोरोनाचं संकट असल्या कारणानेच मूर्तीची प्रतिष्ठापना न करता, मंडळातर्फे लोकांना आरोग्यसेवा मिळणार आहे.
www.konkantoday.com