
मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधणार- विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर
मुंबई-गोवा महामार्गाच्या समस्यांबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे लक्ष वेधणार असल्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना टीव्हीएस शोरूम येथील रस्ता ४ फूट खाली बसवला गेल्यामुळे पावसाळ्याच्या सुरूवातीसच या रस्त्यावर पाणी साचून वाहतूक ठप्प झाली होती. त्यासंदर्भात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाला निवेदन दिले होती.
महामार्गाच्या समस्या जाणून घेण्यासाठी काल विधान परिषद विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी महामार्गाच्या कामाची पाहणी केली. आर.एस.एन हॉटेल उद्यमनगर येथील महामार्गाची पाहणी केली.
www.konkantoday.com