
चिपळूण शहरातील पाणीपट्टी व घरपट्टी माफ करावी यासाठी चिपळूण नगर परिषदेवर शिवसेनेची धडक
लॉकडाऊन काळातील चिपळूण शहरातील नागरिकांची पाणीपट्टी आणि घरपट्टी माफ करून नागरिकांना दिलासा द्यावा व शहरातील बाजारपेठ सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा द्यावी अशी मागणी शिवसेनेने मुख्याधिकार्यांकडे केली. मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
शिवसेनेने सोमवारी पालिकेवर धडक दिली. चिपळूण विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख प्रतापराव शिंदे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, तालुका समन्वयक राजू देवळेकर, नगरसेवक शशिकांत मोदी, मनोज शिंदे, रश्मी गोखले, माजी नगरसेवक महंमद फकीर, संजय रेडीज, महिला आघाडी प्रमुख वैशाली शिंदे, उपशहरप्रमुख यतीन कानडे, उपशहर प्रमुख सुनील कुलकर्णी, राकेश देवळेकर, युवा सेना शहरप्रमुख निहार कोवळे, विभागप्रमुख बाळ परांजपे, अंकुश आवले यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com