
राष्ट्र सेवा दलाचे साने गुरुजी सेवा पथकाचे वादळग्रस्त आडं , उटंबर, नवानगर मदत वाटप
निसर्ग वादळाने उध्वस्त केलेल्या कोकण किनारपट्टी वरील दापोली तालुक्यातील आडं, उटंबर, नवानगर या वादळात उध्वस्त झालेल्या भागांत राष्ट्रसेवादलाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. आणि येथील उध्वस्त बागायती परिसर याची साफसफाई आणि स्वच्छता करण्याासाठी राष्ट्र सेवा दलाचे सानेगुरुजी सेवा पथक (१५ जणांचे )राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय संघटक सदाशिव मगदूम* यांच्या नेतृत्वाखाली काल १९ जून पासून कार्यरत झाले आहे. सांगली, कोल्हापूर येथे गेल्यावर्षी आलेल्या पूरपरिस्थिती मध्ये राष्ट्र सेवा दलाच्या या सेवा पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. पुढील महिना दोन महिने आवश्यकतेवर नुसार येथे श्रमदानासाठी अनेक तरुण सहभागी होणार आहेत त्याचे नियोजन दापोलीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते विकास घारपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल असे राष्ट्रसेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डाॅ गणेश देवी यांनी सांगितले
नैसर्गिक आपत्तीत कोकणवासीयांच्या मदतीसाठी मदतसाहित्यांत पाच लोकांच्या कुटूंबाला आठ दिवस पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचे किट घरासाठी- ताडपत्री, छतासाठी प्लाॅस्टीक कापड, बॅटऱ्या, मेणबत्त्या, काडीपेटी, मास्क घेऊन १५ सेवादल सैनिकांचे सेवापथक काल सकाळी आडं येथे आले . 22 तारखे पर्यंत हे सेवापथक दापोली तालुक्यातील काही गावांमध्ये श्रमसहयोग देणार आहे. या सेवापथकात मिरजेतून सदाशिव मगदूम, शोभा मगदूम, कोमल मगदूम, मिलिंद कांबळे, पृथ्वीराज सातपुते, अक्षय सुंके व इचलकरंजीतून हरिकृष्ण अडकिल्ला, रोहीत दळवी, दिगंबर मतीवडे व गौरी कोळेकर सहभागी झाले आहेत.
काल दि १९ जून रोजी राजन इंदूलकर ( चिपळूण ) प्रा. ज्ञानेश्वर गाथाडे, अभिजित हेगशेटये ,विवेक, विकास घारपुरे , सदाशिव मगदूम यांनी नवानगर, उटंबर, आडं या गावात जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले.
या निमित्ताने या परिसरातील सध्याचे भीषण प्रश्न आणि गरजा लोकांनी व्यक्त केल्या.
- शासनाची मदत येतांना त्यात भेदभाव होतात काही ठिकाणी पोहोचते तर काही ठिकाणी नाही राॅकेल ५ लिटर जाहीर असतांना आडं भागांत फक्त १ लिटर मिळाल्याची खंत व्यक्त होते
- विज नाही पुढील महिना दोन महिने येण्याची शक्यता नाही पडलेले पोल उभारण्यासाठी एमएसइबी कडे यंत्रणा नाही. मिट्ट अंधारात रात्र अंगावर येते किमान मेणबत्ती अथवा सोलर साईट मिळावे ही या सार्या भागातील गरीब मच्छिमारांची मागणी
- वादळीभरतीने विहीरींत खाडीचे पाणी घुसले ती पीण्यासाठी अयोग्य झाले लाईट नाही त्यामुळे पंप बंद आहेत. टॅंकर आठवड्यातून फक्त दोन दिवस प्रत्येक घराला दोन हंडे पाणी.
शासनाने सध्या टॅंकर वाढवून देणे , जनरेटर आणून पाण्याचे पंप चालू करुन देणे गरजेचे - घरावरील पत्रे , नळे उडाल्याने येथील सर्व घरांना पावसात घर झाकण्यासाठी पत्रे पाहिजेत शासनाकडून एकही पत्रा या भागांत पोहोचला नाही काही संस्थांनी पाठविले मात्र ते मच्छिमार आणि गरिबांच्या घरांपर्यंत या गावात नाही पोहोचले
- येथील काही घरांचा वीमा आहे मात्र येथील तलाठी संबधीतांना ८अ उतारा देत नाही आवश्यक कागदपत्र देत नाही. या आठ गावांसाठी एक तलाठी त्यामुळे पंचनामे व्यवस्थित होत नाहीत आणि वीमा असून नुकसानभरपाई मिळत नाही
- कोकण कृषिविद्यापीछाने यांत महत्वाची संशोधन पातळीवर भूमिका घेणे महत्वाचे आहे. या कोसळलेल्या हजारो लाख माड वृक्षांच्या लाकडांचे काय करायचे त्याचा उपयोग आर्टिस्टिक फर्निचरसाठी करता येईल का? अन्य भाग याचे संशोधन करणे आवश्यक
युवकांशी संवाद
आडं येथे मदतवाटप करतांना नितीन झेंडे या तरुणाची भेट झाली एमएस्सी झालेला आणि मुंबईत वरिष्ठ पदावर काम करणार्या नितीनची अपेक्षा होती मी या तरुणांशी संवाद करावा. मदतवाटप आणि श्रमदानानंतर मी आणि राजन तेथे पोहोचलो तर तब्बल ५० पेक्षा अधिक उत्साही मुलांचा जथा. त्यांना सेवादलाच्या कार्यांचे तत्वाचे सानेगुरुजींच्या विचाराचे महत्व सांगितले. आज कोविड १९ यामुळे आपण आपल्या गावात आहात. आपल्याला आपल्या भोवतालच्या नैसर्गिक संपत्तीचे आणि त्याच्या निर्माण क्षमतेचे महत्व जाणून घेतले पाहिजे. तुम्हा युवकांना आज मुंबईचे आकर्षण आहे तमाम महाराष्ट्र आणि जगभरातल्या लोकांना या दापोली तालुक्यांतील विलोभनीय निसर्ग आणि समुद्र किनार्याचे. पारंपारीक रोजगारीच्या वैचारीक चौकटीच्या बाहेर पडू या वेगळा विचार करु या! आणि संकट हीच नव्या प्रगतीची संधी म्हणत त्यांवर स्वार होऊ या!
डाॅ गणेश देवी यांच्या संकल्पनेतील रिस्किलींग सेंटर येथील शाळेत सुरु करु या!
या सार्या मुलांची त्यासाठी तयारी जाणवली
या प्रत्येकाच्या मनात एक चीड आहे स्थानिक पातळीवरील भ्रष्टाचाराची
सुरवातीला सकाळी गावात प्रवेश केला तेंव्हा एक अनखोळखी अलिप्तता जाणवत होती. कोणी परके श्रमदानाला आले आहेत करतील आणि जातील अशी भावना त्या खिडकीतील नजरेतून सुचवत होती. मात्र सायंकाळी ५० युवकाचा सळसळता उत्साह ट्रकमधील सामान उतरतांना अनुभवला. आता आम्ही यापुढच्या श्रमदानात आघाडीवर असणार हे त्यांचे शब्द नव्यानपरिवर्तनाची नांदी आहे.
अभिजित हेगशेटये