
जेएनपीटी बंदरातून नुकताच १३ मेट्रिक रक्तचंदनाचा साठा जप्त
जेएनपीटी बंदरातून नुकताच १३ मेट्रिक रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. न्हावा शेवा डीआरआय विभागाने छापा टाकून ही कारवाई केली आहे. याप्रकरणी डीआरआय विभागाने दोन संशयितांना अटक केली आहे. या रक्तचंदनाची किंमत अंदाजे चार कोटींच्या घरात असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जेएनपीटी बंदरातील कार्गोमधून शारजा-यूएई येथे 29 मेट्रिक टन कांदा पाठवण्यात येणार होता. मात्र, कांद्याच्या नावाखाली चोरट्या मार्गाने दुर्मीळ रक्तचंदनाची तस्करी करण्यात येत असल्याची माहिती न्हावा-शेवा येथील डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून छापा टाकला.
www.konkantoday.com