
शासकीय मेगाभरती आता कोरोनामुळे पुन्हा लांबणीवर
तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात घोषित झालेली शासकीय मेगाभरती आता कोरोनामुळे पुन्हा लांबणीवर पडली आहे. दरमहा राज्याच्या तिजोरीत 25-26 हजार कोटींचा महसूल जमा होणे अपेक्षित असतानाही एप्रिल व मे महिन्यात अवघा 13 हजार कोटींचा महसूल जमा झाला. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खर्चावर नियंत्रण आणले असून आरोग्य विभागाशिवाय अन्य कोणत्याही विभागांची पदभरती होणार नसल्याने स्पष्ट केले आहे.
www.konkantoday.com