
निसर्ग चक्रीवादळामुळे जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
निसर्ग चक्रीवादळामुळे राज्यातील अनेक ठिकाणी घर, शेती आणि फळबागांचं मोठं नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु असून नुकसानग्रस्तांना गेल्या आठवड्यात जाहीर केलेल्या मदतीपेक्षा आणखी वाढीव मदत देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याबाबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे मुख्यमंत्री बोलत होते.
www.konkantoday.com