
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारचा सेवा पदकाने सन्मानित
केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने रत्नागिरी जिल्ह्यातील आठ पोलीस अधिकार्यांना सेवा पदकाने सन्मानित केले आहे. रत्नागिरी शहर डीवायएसपी गणेश इंगळे, चिपळूणचे डीवायएसपी नवनाथ ढवळे, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस वाहतूक निरीक्षक अनिल विभुते, तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुरेश कदम, सहा. पोलीस निरीक्षक सुशांत वराळे, पोलीस उपनिरीक्षक राज पन्हाळे व संदीप वांगणेकर, सहा. उपनिरीक्षक बडेसाहेब नायकवडी या आठ अधिकार्यांना केंद्र सरकारने मानाचे पदक देवून सन्मानित केले आहे. या अधिकार्यांनी राज्यातील गोंदीया, गडचिरोलीसारख्या अत्यंत नक्षलग्रस्त व संवेदनशील भागात दोन वर्षे आणि त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजावली होती. म्हणून या पोलीस अधिकार्यांना केंद्र सरकारच्या गृहविभागाने पदक देवून गौरव केला आहे. तसेच हे काम करताना या अधिकार्यांनी या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून परिवर्तनाचे काम केले आहे. याची दखल केंद्र शासनाने घेवून त्यांना सेवा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.www.konkantoday.com