
जयगड ग्रामपंचायतीच्या तीन वर्षात चोरीला गेलेल्या कागदपत्रांच्या चाेरी प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल
जयगड ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून २००८ ते २०१७ पर्यंतची ग्रामपंचायतीची कागदपत्रे २०१७ ते २०२० या कालावधीत चोरीला गेल्याची फिर्याद जयगडच्या सरपंच फरजाना डांगे यांनी जयगड पोलीस स्थानकात केली आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयात असलेली सती मंदिर संरक्षण भिंतीचे इस्टीमेट कागदपत्र, ग्रामनिधीच्या व्हाऊचरची फाईल, ग्रामपंचायतीचे सामान्य कॅशबुक, ग्रामपंचायतीची २०१७ सालापर्यंतची ऑडीटची फाईल, २००९ ते २०१७ पर्यंतचे ग्रामपंचायतीमधील विकास कामांचे इस्टीमेट व मुल्यांकन दाखले आदी कागदपत्रांची अज्ञात इसमाने चोरी केल्याची फिर्याद दाखल केली आहे. याबाबत सुरूवातीला रत्नागिरी पंचायत समितीकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या सल्ल्याप्रमाणे आता पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
www.konkantoday.com




