
रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या २६ जवानांचे पथक दाखल
अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीसह मुंबईला बसण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे वादळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य शासनाने किनारी भागातील जिल्ह्यांमध्ये सुरक्षिततेसाठी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या २६ जवानांचे पथक दाखल झाले असून चिपळूण येथे त्यांची व्यवस्था केली आहे. या पथकाच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. सायंकाळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आढावा बैठक घेऊन महावितरण, बंदर विभाग, मत्स्य विभागासह विविध यंत्रणांकडून तयारीचा आढावा घेतला.
www.konkantoday.com