
स्मशानभूमित जावून महिलेने रॉकेल ओतून जाळून घेतले
लांजा ः लांजा कुंभारवाडी येथील सौ. सुलोचना दशरथ बारसकर (६२) या महिलेने घरातील लोक कार्यक्रमाला गेल्याचा फायदा घेवून लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत जावून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतले. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. लांजा कुंभारवाडी येथे सदरची महिला आपल्या पतीसह रहात होती. गेले काही वर्ष तिची मनस्थिती ठिक नव्हती. याआधीही तिने अंगावर रॉकेल ओतून घेवून जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. कुंभारवाडी येथे पुजा असल्याने नमनाच्या कार्यक्रमाला घरातील सर्व मंडळी गेली होती. कार्यक्राहून आल्यानंतर सौ. सुलोचना ही घरात आढळून आली नाही त्यामुळे तिचा शोध सुरू केला असता घराच्या मागील बाजूस असलेल्या लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत सुलोचना ही अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली