
मागील दोन महिन्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल १कोटींपेक्षा जास्त दंड वसुल
रत्नागिरी वाहतूक विभागाने लॉकडाऊनच्या काळात वेगळा विक्रम केला आहे. कारण, मागील दोन महिन्यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल १कोटींपेक्षा देखील जास्त दंड वसुल केला आहे. लॉकडाऊनची घोषणा झाली आणि त्यानंतर देखील अनेक वाहन चालक रस्त्यांवर फिरताना दिसत होते. वाहतूक विभाग असेल किंवा पोलीस यंत्रणा यांनी वारंवार आवाहन केल्यानंतर देखील ही संख्या काही कमी होताना दिसत नव्हती.अनेक वाहन चालक दंड भरण्यापेक्षा हेल्मेट विकत घेत आहेत. ही बाब तशी सकारात्मक म्हणावी लागेल. कारण, यापूर्वी वारंवार आवाहन केल्यानंतर देखील वाहन चालक त्याकडे दुर्लक्ष करत होते. पण, आता मात्र त्यांच्याकडून नियम पाळले जात आहेत
www.konkantoday.com
