
फिनोलेक्स,मुकुल माधव फाउंडेशन तर्फे फणसोप, भाट्ये, ग्रा. प. ना पाणीपुरवठा
पाणी पुरवठा आणि जल संवर्धनाच्या क्षेत्रातील आपले योगदान चालू ठेवत फिनोलेक्स आणि मुकुल माधव फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फणसोप आणि भाट्ये या कंपनीच्या रत्नागिरी येथील कार्खान्याच्या जवळच्या गावाना दरवर्षी उन्हाळ्यात जेव्हा पाण्याचा खुप तुटवडा असतो तेव्हा पाणी पुरवठा केला जातो. यंदाच्या या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ फणसोप येथे झाला. फणसोप आणि भाट्ये गावचे सरपंच त्याच प्रमाणे ग्रामपंचायत सदस्य आणि फिनोलेक्स व मुकुल माधव फौंडेशन चे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. दोनही गावच्या सरपंचानी तसेच ग्रामपंचायत सदस्यानी यावेळी कंपनी आणि मुकुल माधव फौंडेशनचे पाणी पुरवठा करण्याच्या या खूप मोलाच्या कार्याबद्दल आभार व्यक्त केले आणि मनापासून धन्यवाद दिले.
www.konkantoday.com





