
भाजप आमदारांच्या निधीच्या माध्यमातून कोकणसाठी २ ते अडीच कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर
आम्ही कोकणच्या दौर्यावर पाहणीसाठी आलो असलो तरी केवळ पाहाणी करून चालणार नाही तर येथे लागणार्या मदतीसाठीही आमचे हात पुढे असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रत्नागिरी येथे बोलताना सांगितले. आपण स्वतः व आ. निरंजन डावखरे, आ. भाई गिरकर, आ. प्रसाद लाड, आ. रमेश पाटील हे भाजपचे पाच विधानपरिषदेचे सदस्य आहेत ते प्रत्येकी ५० लाख रुपये यासाठी आवश्यक असणार्या कामाच्या मदतीसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी देण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
जिथे जिथे गरज लागेल तेथे आम्ही मदत करण्यास तयार आहोत. पनवेल येथे एमजी हॉस्पिटलला आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी प्रत्येकी ५० लाख रुपये व्यवस्थेसाठी दिले. महाडला ५० बेडच्या हॉस्पिटलसाठी ३० लाख रुपयांची आवश्यकता होती तीही आम्ही दिली. आजही आम्ही रत्नागिरी जिल्हाधिकार्यांची भेट घेवून त्यांना सांगितले की, स्वॅब सेंटरसाठी किंवा अन्य कामासाठी निधी कमी पडला तर आमच्या या आमदारांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आम्ही प्रशासनाला आश्वासन दिले आहे. आमच्या मदतीमुळे आमच्या कोकणच्या बांधवांचा जीव वाचणार असल्याने आम्ही हा निधी देण्याची आमची मानसिकता आहे असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com