
अम्फन महाचक्रीवादळ आज भारत आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडक देणार
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं अम्फन महाचक्रीवादळ बुधवारी (२० मे) भारत आणि बांगलादेशच्या किनारपट्टीला धडक देणार आहे. या चक्रीवादळाची तीव्रता बघता किनारपट्टीवरच्या लाखो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.
आज दुपारपर्यंत हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करत असलेल्या पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या अडचणीत या चक्रीवादळामुळे आणखी वाढ झालेली आहे.
ओडिशात अनेक ठिकाणी जोरदार वारे आणि प्रचंड पावसाला सुरुवात झाली आहे.
www.konkantoday.com