तालुक्यातील जयगड खंडाळा बायपास रोडवरील चाफेरी येथे टेम्पो रस्त्यावर उलटून हौद्यातील दोघांचा मृत्यू

रत्नागिरी तालुक्यातील जयगड खंडाळा बायपास रोडवरट्रकला ओव्हरटेक करून पुढे जाणाऱ्या टेम्पोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्यावर उलटून हौद्यातील दोघांचामृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले आहेत.
चालक राजेंद्र कोलकांड हा आपल्या ताब्यातील टेम्पो घेऊन खंडाळा ते जयगड असा जात होता. टेम्पोच्याहौद्यातून पाच जण प्रवास करत होते. टेम्पो चाफेरी गवळीवाडा येथे आल्यानंतर समोरून जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करून टेम्पो पुढे जात असताना वळणावर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो साईड पट्टीवर उलटला. यावेळी टेम्पोच्या हौद्यात बसलेले शिवाजी जयसिंग रजपुत , गोनौर वैजनाथ राव या दोघांचा मृत्यू झाला तर रामानुज शालीनी सिंह, सुंदरम संजय सिंह, नागेंद्र विनोद गुप्ता हे जखमी झाले आहेत.त्यांना नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.चालक राजेंद्र कोलकांड याच्याविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button