
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांच स्वागत : अभाविप
कोरोना पार्श्वभूमीवरती UGC च्या गाईडलाईन्सनुसार आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री श्री.उदय सामंत यांनी राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांबाबत घोषणा केली.
प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता सरासरी गुण देत त्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाच अभाविप स्वागत करते. ज्या पद्धतीने अभाविप या सगळ्या विषयांमध्ये सरकारसोबत होती आणि सरकारला वारंवार निवेदने दिली त्या मागणीनुसार प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांच्या निकालावर सरसकट पास हा शेरा न देता ग्रेडिंगनुसार मार्क दिले जाणार आहेत. असे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. “विद्यार्थ्यांचे हित व भविष्य लक्षात घेता अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला असल्याने एक प्रकारे गुणवत्तेचा विचारही या मध्ये केला असून या निर्णयाचे स्वागत अभाविप करते.” असे कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवार म्हणाल्या.
तसेच “आज सरकारने घेतलेला निर्णय हा स्वागतहार्य असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यहीताचा निर्णय घेतला आहे याबद्दल सरकारचे अभिनंदन. या निर्णयामध्ये अन्य जिल्ह्यातील व परराज्यातील विद्यार्थ्यांचा देखील विचार करण्यात यावा.” असे राष्ट्रीय मंत्री श्री. अनिकेत ओव्हाळ म्हणाले.