
कोटा येथे अडकून पडलेल्याविद्यार्थांना परत आणण्यासाठी १०० एसटी बस सोडणार
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. त्यामुळे सध्या देशात सामान्य नागरिकांना कुठेही येण्या-जाण्यास, प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल २ हजार विद्यार्थी हे राजस्थानमधील कोटा येथे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना आपल्या घरी परत आणण्यासाठी राज्य सरकारने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकार या विद्यार्थांना परत आणण्यासाठी १०० एसटी बस सोडणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
www.konkantoday.com