
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला गती देऊ-रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी
वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाला गती देऊ, अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली. मुंबई-बेंगलोर इंडस्ट्रीअल कॉरिडॉरचे प्रारंभिक सर्वेक्षण पूर्वीच झाले आहे. या प्रकल्पालाही संपूर्ण सहकार्य करू, असेही त्यांनी सांगितले.वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (वेसमॅक) वतीने ‘कोरोनानंतरचा भारत – आव्हाने व संधी’ या विषयावर आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते.
www.konkantoday.com