
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित
कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.
गेल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे आरक्षण कालावधी कमी करण्याच्या मागणीसाठी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहार
केला. याबद्दल डी. के. सावंत यांनी खासदारांचे आभार मानले आहेत.
www.konkantoday.com