
रत्नागिरी येथून मालवण तालुक्यातील चुनवरे गावी आलेला युवक होम कोरंटाईन
लॉकडाऊन असताना रत्नागिरी येथून मालवण तालुक्यातील चुनवरे येथे गावी आलेल्या एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे या युवकास आंबेरी चेकपोस्ट परिसरात रिक्षाने आणण्यास गेलेल्या दोघावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रवासासाठी वापरण्यात आलेली रिक्षा सुद्धा जप्त करण्याची कारवाई मसुरे पोलिसांनी केली आहे. सदर युवकाला होम कोरंटाईन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com




