
डोंबिवली मधील रिक्षाचालकाची अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना मोफत सेवा ,आदित्य ठाकरे यांचे कडुन दखल
कोरोनामुळे सध्या लॉक डाऊन सुरु आहे. लोकांना घराबाहेर पडण्याची मनाई करण्यात आली आहे. सोबतच वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आपातकालीन काळात सामान्य नागरिकांना रुग्नालयात जाण्यासाठी कुठलेही वाहन उपलब्ध होता नसल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र डोंबिवली मधील एक रिक्षाचालक अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना मोफत सेवा उपलब्ध करून देत आहे. आणि याची माहिती कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे याना माहिती पडताच त्यांनी न विसरता या रिक्षाचालकाचे आभार मानले आहे.
www.konkantoday.com




