
डीएचएफएल’चे संस्थापक कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत,प्रधान सचिव सक्तीच्या रजेवर
लॉकडाऊनच्या कालावधीतही ‘डीएचएफएल’चे संस्थापक कपिल वाधवान आणि त्यांच्या कुटुंबाला खंडाळ्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत करणे, प्रधान सचिवांना भोवले आहे. वाधवान कुटुंबातील 23 जणांना प्रवासाची सवलत देणारे पत्र जारी केल्याने प्रधान सचिव अभिनव गुप्ता यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.
अमिताभ गुप्ता यांनी अधिकारांचा गैरवापर करत वाधवान कुटुंबाला महाबळेश्वरला जाण्यासाठी मदत केल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
www.konkantoday.com