
सिंधुदुर्ग पोलिसांची विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई
संचारबंदी आदेश असतानाही विनाकारण फिरणाऱ्या वाहनांवर देवगड पोलीस ठाणे यांनी कारवाई करून वाहने जप्त केली तसेच त्यांचेविरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले.यामध्ये काही अलिशान गाड्यांचा देखील समावेश आहे.जिल्ह्यात दुचाकीवरून विनाकारण फिरणाऱ्या २३३ इसमांवर संचारबंदीचा आदेश भंग केल्याबद्दल कारवाई करण्यात आली असून एकूण १७३ दुचाकी वाहने दि.०५/०४/२०२० अखेर सिंधुदुर्ग पोलिसांनी जप्त केलेली आहेत.नागरिकांनी संचारबंदी कटाक्षाने पाळून रस्त्यावर विनाकारण फिरू नये असे पोलीसांनी सांगितले आहे.
www.konkantoday.com



