
रत्नागिरीत तिसरा कोरोना रुग्ण सापडला
रत्नागिरीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला आहे.रत्नागिरी नजीक साखरतर येथील ५२ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.४ एप्रिलला तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.काल या महिलेचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.यामुळे आता ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
www.konkantoday.com