
संगमेश्वर तालुक्यात दोन जणांच्या आत्महत्या
संगमेश्वर तालुक्यात दोन जणांनी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.माभळे पुनर्वसन येथील राहणारा किरण पवार या २७ वर्षाच्या युवकाने आजाराला कंटाळून नदीत उडी मारून आत्महत्या केली. दीड वर्षांपासून तो आजारी होता.त्याचा मृतदेह आज नदी किनारी सापडून आला.नावडे येथील मनीषा जाधव यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार घडला.आत्महत्येचे कारण कळलेले नाही.
www.konkantoday.com