
जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील प्रमुख दिवसभरातील अपडेट
दि.२१-०३-२०२०
१) जिल्हा शासकीय रुग्णालयात 11 जण विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे. 20 मार्च रोजी ही संख्या 10 होती. रुग्णालयातून तपासणीनंतर घरीच विलगीकरणासाठी पाठविलेल्यांची संख्या 11 आहे.
२) जिल्हयात परदेश प्रवासातून आलेल्यांना त्यांच्या घरीच विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे अशा व्यक्तींची एकूण संख्या आता 165 आहे.
३) जिल्हयातील सर्व बंदरावर जहाजात चढ-उतार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.
४) सर्व महामार्गांवर आठ तपासणी नाके सुरु आहेत. सोबतच ३ मुख्य रेल्वेस्थानकांवर स्क्रीनिंग करण्यात येत आहे. महामार्गावरील तपासणी नाक्यांवर 21 मार्च 2020 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 1429 वाहने व 9942 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
५) जिल्हयातील जीवनाश्यक सेवा वगळता सर्व लहान मोठया औद्योगिक आस्थापना बंद करण्याचे आदेश जारी.
६) बँकासाठी कामकाजाची नियमावली निश्चित करणारे आदेश निर्गमित.
७) जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे ०२३५२-२२२२३३ व २२६२४८.
८) उद्या रविवार दि. 22 मार्च 2020 रोजी जनता कर्फ्यू ची घोषणा करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापना वैद्यकीय दुकानांसह बंद राहतील असे सहाय्यक कामगार आयुक्तांनी कळविले आहे.
www.konkantoday.com