
सांस्कृतिक केंद्रातील गैरव्यवहार जनतेला कळावा म्हणून महाविकास आघाडीतर्फे चिपळुणात खुर्ची पुजन रॅली
चिपळूण नगरपालिकेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासंबंधी आज होणार्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतर्फे सकाळी शहरातून ढोल ताशांच्या गजरात खुर्ची पूजन रॅली काढली.
ही रॅली सांस्कृतिक केंद्र ते पालिकेपर्यंत काढण्यात आली. सांस्कृतिक केंद्राच्या कामात वाढीव खर्च, मंजुरी न घेता परस्पर केलेली कामे, झालेला गैरव्यवहार याची माहिती जनतेला व्हावी यासाठी ही रॅली काढण्यात आली होती.
www.konkantoday.com