
निरीक्षणगृहातून पळालेल्या मुलीशी लग्न, ५ जणांवर गुन्हा, दोघांना अटक
लांजा महिला निरीक्षण बालगृह येथून पलायन केलेल्या मुलीबरोबर बालविवाह केल्याप्रकरणी सोलापूर येथील युवक व त्याला सहकार्य करणार्या मित्रांसह कुटुंबियांवर लांजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केलले असता त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बळीराम (देवळगनी, ता. भूम, जि. उस्मानाबाद), साजन (मोंडलिंब, ता. माठा, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्यात रूणांची नावे आहेत.
लांजा महिलाश्रम येथे २ अल्पवयीन मलींना ठेवले होते. ७ जानेवारी रोजी रात्री या दोन मुली तेथून पळून गेल्याने लांजा पोलिसांत फिर्याद देण्यात आली होती.
www.konkantoday.com