
महामार्गाच्या दुरावस्थेमुळे लांजा शहरवासियांनी दिला जनआंदोलनाचा इशारा
मे महिन्यापासून बंद असलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, खड्डे, धुळीच्या वाढत्या साम्राज्यामुळे शहरवासीय, व्यापारी, वाहनचालक हैराण झाले आहेत. महसूल यंत्रणेने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास जनआंदोलन करू असा इशारा शहरवासियांच्या वतीने देण्यात आला आहे.
तहसिलदार श्रीमती वनिता पाटील यांच्या दालनात समस्येवर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. नायब तहसिलदार जयप्रकाश कुलकर्णी, महामार्ग बांधकाम विभागाचे उपअभियंता मडकईकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीमती श्वेता पाटील, ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी आदी यावेळी उपस्थित होते.
www.konkantoday.com