
३७ हजार कुटुंबांना दिवाळी भेट, नोव्हेंबरचे ३५ किलो धान्य मंजूर
जिल्ह्याला रत्नागिरी: जिल्ह्यातील हजारो गरीब कुटुंबांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३७हजार १६५ पात्र शिधापत्रिकाधारकांसाठी नोव्हेंबर २०२६ या महिन्याचे अन्नधान्य मंजूर करण्यात आले आहे. या योजनेनुसार प्रत्येक लाभार्थी कुटुंबाला तब्बल ३५ किलो धान्य मोफत दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन वाघ यांनी दिली आहे.
या धान्य वाटपामध्ये प्रत्येक अंत्योदय कार्डधारकाला २० किलो तांदूळ आणि १५ किलो गहू दिले जातील. नोव्हेंबर महिन्याच्या या वितरणासाठी जिल्ह्यासाठी एकूण ६६०.२५ मेट्रिक टन तांदूळ आणि ४७८.५० मेट्रिक टन गहू (एकूण ११३८.७५ मेट्रिक टन) अशा भव्य धान्य साठ्याला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. भारतीय अन्न महामंडळाच्या पनवेल येथील गोदामातून हा संपूर्ण साठा उचलण्यात आला असून तो संबंधित गोदामांपर्यंत पोहोचविला जात आहे.




