रत्नागिरी शहरात आज दुसऱ्या दिवशी ही सायंकाळी मुसळधार पावसाच्या सरी विजेचा कडकडाट , व्यापाऱ्यांचे नुकसान


रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हिटच्या तीव्र झळांनी हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना आजही पावसामुळे दिलासा मिळाला आहे. आज सायंकाळी वातावरण बदलले आणि आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला शहर परिसरात पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली उद्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर दुकानदाराने फुलांचे स्टॉल मांडले होते तसेच बाजारपेठेतही व्यापाऱ्याने दुकाने मांडली होती मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे त्यांची धावपळ झाली तसेच खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाही याचा मोठा फटका बसला पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काही काळासाठी का होईना, दिलासा मिळाला आहे. काल रत्नागिरीत उशिरा पावसाची सर कोसळली होती मात्र आज सायंकाळी सलग दोन तास पावसाने चांगलीच हजेरी लावली याशिवाय विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button